logo
Back

अशी करा MCA CET 2025 ची तयारी

Home / अशी करा MCA CET 2025 ची तयारी


blog

अशी करा MCA CET 2025 ची तयारी


तुम्हीही MCA CET ची तयारी करताय का? तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे, 

 

कारण यामध्ये मी तुम्हाला CET विषयी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे. ज्यामुळे तुम्ही CET मध्ये चांगल स्कोरींग करू शकता.  

यातली पहिली टिप्स् आहे, ती म्हणजे  

प्रथमत: या CET साठीचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे हे बारकाईने समजून घ्या, जेनेकरून तुम्हाला पुढचा अभ्यास कसां करायचा याचे व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल. हा अभ्यासक्रम तुम्हाला cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती जाऊन पाहता येईल. 

त्यानंतरची पुढची महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे 

तुमच्याकडे असलेल्या वेळेचा योग्य पद्धतीने उपयोग व्हावा म्हणून, वेळेचे व्यवस्थित नियोजन करा. यासाठी एक टाईमटेबल बनवा, यात तुमच्याकडे असणारा अभ्यासासाठीचा वेळ आणि अभ्यासाचे विषय याचा अचूक बॅलन्स करा.

यानंतर,

तुम्ही जो अभ्यास कराल तो तुमच्या शब्दात लिहून काढा, म्हणजे तुमची रिव्हिजनही होईल आणि तुमच्याकडे नोट्स देखील तयार होतील. याचा फायदा तुम्हाला जे विषय अवघड जातात त्यासाठी होईल. 

त्यानंतर,

आपण जो अभ्यास करतो, तो किती आपल्या लक्षात राहतो, हे चेक करण्यासाठी नियमित आपण आपली स्वत:ची मॉक टेस्ट घ्या. जेणेकरून तुम्हाला परीक्षा देतेवेळी आपला सर्वात जास्त टाईम कुठे जातो हे लक्षात येईल आणि तुम्हाला वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करणे शक्य होईल.