JEE Advanced परीक्षा न देता ही IIT Madras मध्ये admission येईल घेता!
IIT Madras ने national आणि International Science Olympiads मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशनसाठी नवा मार्ग खुला केला आहे.
'Science Olympiad Excellence' (ScOpE) quota मुळे विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षा न देता IIT Madras मध्ये प्रवेश मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत, प्रत्येक undergraduate program साठी 2 supernumerary seats अॅड केल्या जातील.
त्यातील 1 सीट ही specifically female candidates साठी राखीव असेल. यासाठी अॅडमिशन ही ScOpE रँक लिस्ट (SRL) च्या आधारे म्हणजेच Olympiad performance च्या आधारे निश्चित केली जाईल. यासाठीचे रजिस्ट्रेशन 3 जून 2025 पासून सुरू होईल.
रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी Eligibility criteria जाणून घ्या. Eligibility criteria नुसार candidate हा भारतीय नागरिक किंवा OCI/PIO धारक असावा. ते ही 4 मार्च 2021 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. मागील 4 वर्षात Olympiad training camps मध्ये सहभागी असणं गरजेचं आहे.
यामध्ये IMOTC (Mathematics), OCSC (Physics, Chemistry, Biology), and IOITC (Informatics) या camps चा ही समावेश होतो. या कोटासाठी 17 undergraduate programs मध्ये एकूण 34 seats उपलब्ध होतील.